BLOGGER TEMPLATES AND TWITTER BACKGROUNDS

Wednesday, June 22, 2011

# निथळणारा पाऊस ...


पाऊस आला...पाऊस आला...पावसाच्या पहिल्याच सरीनं धरित्री तृप्त होते. वृक्ष-वल्ली सुखानं माना डोलवू लागतात आणि भूतलावर हिरवागार गालिचा अंथरणारी गवतपाती सुखानं हुरळून जातात. पहिल्या सरीनंतर उरणारे पाण्याचे थेंबही असं बोलू लागतात..







# मला समजून घ्या रे !

या दुनियेत काही माणसं अशी असतात की, जी चेहे-यावर आपल्या मनातल्या भावना उतरवू शकत नाही.. त्यांनाही आनंद होतो, दु:ख होत, पण ते दाखवता येत नाही.. अश्या माणसांना आपण नेहेमी एक विशिष्ट शब्द वापरतो, 'मख्ख चेहे-याने बसलाय' जरा आनंद/दु:ख जाणवू देत की चेहे-यावर' मात्र अशा माणसांना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा...

चेहरा माझा सदैव कोरा, कुणालाही समजत नाही
मनामधल्या भावना या समोरच्याला उमजत नाही
कशी होईल यातून सुटका.? काहीतरी सांगा रे
माझे म्हणणे एवढेच आहे, मला समजून घ्या रे !..

मनात खूप असते माझ्या, चेह-यावरून कळत नाही
माझ्या भावना मणाकडून चेह-याकडे वळत नाहीत
चेह-यावरून कळत नसेल तर आडाखे तरी बांधा रे
माझे म्हणणे एवढेच आहे, मला समजून घ्या रे !..

चेहरा बोलका असतो खरा, मी मात्र अपवाद आहे
का माझ्या भावनांचा चेह-याबरोबर वाद आहे.?
माझाच चेहरा का असा.? त्याला काही शिकवा रे
माझे म्हणणे एवढेच आहे, मला समजून घ्या रे !..

कधी माझ्या चेह-यावरची माशीसुद्धा हलत नाही
भावनांचे व्यक्त होणे बहुदा त्याला चालत नाही
काहीही असो, तुम्हीच त्याला हात धरून चालवा रे
माझे म्हणणे एवढेच आहे, मला समजून घ्या रे !..

मीही खूप प्रयत्न केला चेह-याद्वारे बोलण्याचा
मनामधल्या भावनांना चेह-यावरती आणण्याचा
जमले नाही काहीच, आता तुम्हीच त्याला सावरा रे
माझे म्हणणे एवढेच आहे, मला समजून घ्या रे !..

# धुक्यात हरवलेला सिंहगड


राज्यात अपेक्षेपेक्षा लवकरच पाऊस सुरू झाल्यामुळे, शेतकऱ्यांची विविध कामांसाठी घाई चालू झाली आहे. निसर्गानेही हिरवाईचा शालू पांघरल्यामुळे, भटक्यांचीही पायपीट यंदा लवकरच चालू झाली आहे. पुण्याजवळचा सिंहगड हा पुणेकरांचा जिव्हाळ्याचा विषय. या परिसराचे जूनच्या पहिल्याच आठवड्यात बदललेले रूप टिपले आहे






Sunday, June 19, 2011

# फोटो एल्बम











# मेघमल्हार - ताम्हिणी घाट


कळ्या हिरव्या नीपांच्या काही उमलल्या
पहा सजवती नदिच्या केशरी तीरांना
अनलाने भक्षिल्या वनांना गंध भूमीचा
नेतील सारंग मार्गे जीवन वर्षण्याच्या

चराचर ज्याची आतुरतेनं वाट पाहात होती, तो यक्षाचा दूत असलेला मेघ अखेर बरसला. वृक्षवल्ली ताज्या हिरवेपणानं बहरल्या, तृणांचे कोंब धरित्रीच्या कुशीतून मेघमल्हाराची तान, शिरकमलं उंच करून पाहू-ऐकू लागली, गिरीकंदरांच्या अंगा-खांद्यावरून फेनधवल धारा प्रपातांच्या रुपानं बरसू लागल्या. साहजिकच भटक्यांची पावलं सह्यकड्यांचा वेध घेण्यास सज्ज झाली. प्रपातांमध्ये भिजताना त्यांचे अंगांग थरकून गेले, आणि कृषिकांची धांदल उडाली. मेघवर्षावाचा आनंदच काही और असतो. ही पाहा ताम्हिणी घाटातील विविध रुपं...









Friday, June 17, 2011

# आयुष्य,चहा आणि चहाचा कप




आयुष्य,चहा आणि चहाचा कप  यात  एक  वेगळंच  नातं  आहे .
आयुष्य  हे  चहा  सारखे  असतं  ...गरम  पिण्यातच  मजा!
 एकदा  थंड  झालेला  चहा  परत  गरम  करून  पिण्यात  काही  मजा  नाही. चहा  थंड  प्या ,गरम  प्या  किंवा  फेकून  द्या .....शेवटी उरतं तो फक्त  रिकामा  ग्लास ......
पण  त्या  रिकाम्या  ग्लासला  पण आशा  असते ......
नवीन  ताजा  चहा  पडण्याची ...


"तुका  म्हणे  उगी  राहावे . ..जेजे  होईल  ते  ते  पाहावे " 
 या  उक्तीला  स्मरून  तो  बिचारा  ग्लास  निर्विकारपणे  येणाऱ्या  प्रत्येक  चहा  कडे  बघतो ....


फक्कड  चहा  पडला  म्हणून  आनंदून  जात  नाही ...कि   रटरट  उकळलेला  काळा चहा  पडला  म्हणून  तो  रडत  नाही ....
येणारा  प्रत्येक  चहा   स्वतः चा  असा  रंग ,चव  घेऊन  येतो .....
आणि  त्या  बदल्यात  कपाला  उब  देऊन  जातो ....
तो  बिचारा  तेव्हड्यावरच खुश !!!..
पण  त्याचा   हा जल्लोष  टिकतो  तो  त्यातला  चहा   संपेपर्यंत ........
चहा  संपला  की लगेच  त्याला  बुचकळून काढलं जातं.
नवीन  चहा  ला  सामोरं जाण्यासाठी ..
स्वतचा  सगळं  विसरून  हा  पठ्ठ्या  मात्र  आपल्याला   शिकवतो -----आस्वाद  घ्यायला   ...
एवडूसा तो  चहाचा  कप  पण  मला  मात्र  खूप  काही  देऊन  जातो ...
हरेक  चहा  त्यावर स्वतची   छाप ,,चिकटपणा  ठेऊन  जातो .....पण  दरवेळी  बुचकळून  काढल्यानंतर  हा    मात्र  पहिल्यासारखाच  स्वच्छ..
कसं  जमत  याला  कुणास  ठाऊक?...
कदाचित याचा कडे असावा बुचकळणारयाचा  हात .त्याचीच ही किमया असावी. 


सुख  असो  वा  दुख: त्याला  सहजपणे  सामोरं  जायला  हवं  हे तो दर्शवतो.    
नकारात्मक  विचारांची  मालिका,मनावरचा  मळभ,.वाईट  संगत,न्यूनगंड  या  गोष्टी  सहज  फेकून  देता  येत  नाहीत ..त्या  फेकायला  एक  झटका लागतो ....
त्या  झटक्याचा  source  आपल्याकडे  असण  महत्त्वाचं! ...
नकारात्मक  विचार  तर  सतत  आपल्या  आजूबाजूला  असतात ...पण  त्यांना  धुवून  कसं  टाकायचा  हे  माहित  पाहिजे .........
शेवटी  रितेपण  हेच  शिल्लक  राहणार ...त्याला  काही  उपाय  नाही ....
ग्लासातल्या  चहा  प्रमाणे  आयुष्याचाही  volume   कमी  कमी  होत  होत मृत्यूची भेट  होणार  आहेच  .....
पण  या  सर्व  अवधीत  एकाच  प्रश्नाचं  महत्व  आहे ....


आस्वाद  घेतला  का ????


Friday, June 10, 2011

# Love Bird












# गरुड - Eagle